Mahavitaran’s state-level sports competition: महावितरणच्या २०२५-२६ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी उपविजेता असलेल्या पुणे-बारामती संघाने हे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाने स्पर्धेतील उपविजेते पद मिळविले.

नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघ उपविजेता
अकोला/अमरावती : महावितरणच्या २०२५-२६ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी उपविजेता असलेल्या पुणे-बारामती संघाने हे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाने स्पर्धेतील उपविजेते पद मिळविले.
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा शनिवारी (दि. १५) सायंकाळी समारोप झाला. यावेळी महावितरणचे संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्याहस्ते अजिंक्यपदाचा करंडक पुणे-बारामती परिमंडल संघाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे व श्रीकृष्ण वायदंडे आणि सहकाऱ्यांनी स्वीकारला. तर उपविजेत्या नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाकडून मुख्य अभियंता सुहास रंगारी, दिलीप दोडके, हरीष गजबे व सहकाऱ्यांनी करंडक स्विकारला.
पारितोषिक वितरणच्या कार्यक्रमाला स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके, मुख्य अभियंता राजेश नाईक, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे,अधीक्षक अभियंते दिपक देवहाते, प्रविण दरोली,दिपाली माडेलवार यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांना करंडक व सुवर्ण/रौप्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी आयोजन समितीचे सचिव व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सुत्रसंचालन कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे आणि अधीक्षक अभियंता श्रीमती दिपाली माडेलवार यांनी आभार मानले.
.
सांघिक खेळांचे अंतिम निकाल – अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – कोल्हापूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, व्हॉलिबॉल- छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कबड्डी (पुरुष)- पुणे-बारामती व कल्याण रत्नागीरी, कबड्डी (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर, खो-खो (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व नाशिक-जळगाव, टेबल टेनिस (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड व सांघिक कार्यालय-भांडूप, टेबल टेनिस (महिला)- अकोला-अमरावती व कल्याण-रत्नागिरी, बॅडमिंटन (पुरुष)- पुणे-बारामती व छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर, बॅडमिंटन (महिला)- पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कॅरम (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कॅरम (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, ब्रिज- अमरावती-अकोला व छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर, टेनिक्वाईट महिला- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर.
वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) –अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – १०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसाने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), २०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसाने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट- प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) ४०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व रुपेश सकपाळ (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व माधुरी मडाले (अमरावती-अकोला), ८०० मीटर धावणे – पुरुष गट – परेश चौधरी (नाशिक-जळगाव) व वैभव माने (कोल्हापूर), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व स्वाती दमाने (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), १५०० मीटर धावणे- पुरुष गट – एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव) व हर्षल बोंद्रे (पुणे-बारामती), महिला गट- संजना शेजल (पुणे-बारामती) व माधुरी मडाले (अमरावती-अकोला), ५००० मीटर धावणे – पुरुष – एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव) व आल्हाद निस्ताने (नागपूर-चंद्रपूर- गोंदीया), ४ बाय १०० रिले – पुरुष गट – प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, अक्षय केंगाळे, गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसाने, रुपेश सकपाळ, विराज कोटंबकर, ओंकार गोठाळ (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – वेदश्री सोनवणे, रागिनी बेले, स्वाती दमाने, श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व सोनिया मिठबावकर, सारिका जाधव, प्रिया पाटील, श्रेया जाधव (सांघिक कार्यालय-भांडूप), गोळा फेक – पुरुष गट – श्रीकांत धोत्रे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) व प्रवीण बोरावके (पुणे-बारामती), महिला गट – पूजा ऐनापुरे (कोल्हापूर) व प्रियांका शेळके (नाशिक-जळगाव), थाळी फेक – पुरुष गट – इम्रान मुजावर (कोल्हापूर) व धर्मेश पाटील (नाशिक-जळगाव), महिला गट- ज्योती कांबळे (कोल्हापूर) व प्रियांका शेळके (नाशिक-जळगाव), भाला फेक – पुरुष गट – बालाजी कांबळे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) व मिलिंद डोईफोडे (कल्याण-रत्नागिरी), महिला गट – अश्विनी जाधव (कोल्हापूर) व हर्षल मोरे (कल्याण-रत्नागिरी), लांब उडी – पुरुष गट – अक्षय कंगाळे (पुणे-बारामती) व नीलेश वैद्य (अमरावती-अकोला), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व माया येळवंडे (पुणे-बारामती), उंच उडी – पुरुष गट – समीर मन्सूरी ( नाशिक-जळगाव ) व सतीश पाटील (कोल्हापूर), महिला गट – वेदश्री सोनवणे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अश्विनी देसाई (कोल्हापूर),
बुद्धिबळ – पुरुष गट – पंकज देशमुख (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) व संजय देवकाते (पुणे-बारामती), महिला गट- अमृता जोशी (सांघिक कार्यालय-भांडूप) व रंजना तिवारी (कल्याण-रत्नागिरी), कॅरम- पुरुष गट- अंकित बैसरे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व संजय कांबळे (पुणे-बारामती), महिला गट – पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व विजया माळी (कोल्हापूर) टेनिक्वाईट- महिला एकेरी – पुजा ऐनापुरे (कोल्हापूर) व मनीषा चौकसे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी – शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती) व वीणा पाटील-बिंदू रवीशंकर (कल्याण-रत्नागिरी),
शरीरसौष्ठव – ६५ किलो- सुनील सावंत (कल्याण- रत्नागीरी) व शिवम चौघुले (कोल्हापूर), ७० किलो– गोपाल कुलकर्णी (कल्याण- रत्नागीरी) व अमित पाटील (कोल्हापूर), ७५ किलो- नामदेव शिंदे (नाशिक- जळगाव), राजेंद्र जाधव (कल्याण-रत्नागिरी), ८० किलो- राहुल कांबळे (कोल्हापूर) व गोकुल सोनवणे (नाशिक- जळगाव), ९० किलो– प्रविण घुणके (कोल्हापूर) व कैलेश्वर सांगवे (पुणे- बारामती) आणि ९० किलोवरील वजनगटात मो. मुजाहिद अन्वर (अमरावती – अकोला) व अपुर्व शिर्के (कल्याण- रत्नागीरी),
पॉवर लिफ्टिंग – ५९ किलो- दीपक गांगुर्डे (नाशिक-जळगाव) व रवी निर्गणे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड- लातुर), ६६ किलो – तेजस आबाले (अमरावती-अकोला) व गोकुळ खैरनार (नाशिक- जळगाव), ७४ किलो – मनीष कोंड्रा (पुणे- बारामती) व सागर जगताप (कोल्हापूर), ८३ किलो – दिनेश धाडे (नाशिक- जळगाव) व मनिष सवालाखे (नागपूर- गोंदीया- चंदेरपूर), ९३ किलो – प्रसाद हिरे (नाशिक- जळगाव) व महेश इंगोले (नागपूर- गोंदीया- चंदेरपूर), १०५ किलो- श्रीकृष्ण इंगोले (नागपूर- गोंदीया- चंद्रपूर) व प्रवीण तायडे (अकोला- अमरावती)
टेबल टेनिस – पुरुष एकेरी– सागर मातकर (मुख्यालय-भांडूप) व रितेश सवालाखे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), पुरुष दुहेरी- सागर मातकर-मंगेश प्रजापती (मुख्यालय-भांडूप) व अविनाश पवार-सुनील राठोड (कल्याण-रत्नागिरी) महिला एकेरी – स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व रंजना तिवारी (कल्याण-रत्नागिरी), महिला दुहेरी- स्नेहल बढे-कोमल पुरोहित (अकोला-अमरावती) व रंजना तिवारी-प्राची ठाकरे (कल्याण-रत्नागिरी), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भरत वसिष्ठ (पुणे-बारामती) व इम्रान तासगावकर (कोल्हापूर), पुरुष दुहेरी- भरत वसिष्ठ-पंकज पाठक (पुणे-बारामती) व दीपक नायकवडे-गुणवंत इप्पर (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड),महिला एकेरी – अनिता कुलकर्णी (पुणे-बारामती) व वैष्णवी गांगरकर (पुणे-बारामती),महिला दुहेरी- वैष्णवी गांगरकर-अनिता कुलकर्णी (पुणे-बारामती) व ऋतिका नायडू-मृणाली(नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) कुस्ती- ५७ किलो – मतीन शेख (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) व अनिल बागुल (नाशिक-जळगाव), ६१ किलो- अश्विन मोरे (पुणे-बारामती) व विनोद गायकवाड (अकोला-अमरावती), ६५ किलो – राजकुमार काळे (पुणे-बारामती) व विजय जगताप (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ७० किलो- अनंत नागरगोजे (सांघिक कार्यालय-भांडूप) व सरदार हराळे (कल्याण-रत्नागिरी), ७४ किलो- गुरुप्रसाद देसाई (कोल्हापूर) व अमोल मुंगळे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ७९ किलो- संदीप सवत (कोल्हापूर) व अकिल मुजावर (पुणे-बारामती), ८६ किलो- हसनोद्दिन शेख (अकोला-अमरावती) व प्रशांत नाथे (नाशिक-जळगाव), ९२ किलो- महेंद्र कोसारे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व बलराज अलाणे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ९७ किलो- अमोल गवळी (पुणे-बारामती) व हणमंत कदम (कोल्हापूर), १२५ किलो – प्रविण बोरावळे (पुणे-बारामती) व वैभव पवार (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ब्रिज-जोडी:- विवेक मारोडे-अनुप पंडित (अकोला-अमरावती) व ब्रजेश गुप्ता-प्रशांत झाडे (अकोला-अमरावती), सांघिक- ब्रजेश गुप्ता,यज्ञेश क्षीरसागर,प्रमोद कांबळे,प्रशांत झाडे,विवेक मारोडे (अमरावती – अकोला)

