Poshan Mah Abhiyan : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे एकात्मिक बालविकास योजना बाळापूर व अंगणवाडी केंद्र अंदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात मागील १७ सप्टेंबर पासून सुरू असलेला आठवा राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा समारोप करण्यात आला.

अंदुरा : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे एकात्मिक बालविकास योजना बाळापूर व अंगणवाडी केंद्र अंदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात मागील १७ सप्टेंबर पासून सुरू असलेला आठवा राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा समारोप करण्यात आला.
या राष्ट्रीय पोषण माह अभियान कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम,तर प्रमुख उपस्थितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी(महिला बालविकास) राजश्री कौलखेडे बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे , बाळापूर गटविकास अधिकारी नाना पजई , एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भारती लांडे ,अंदुरा सरपंच संजय वानखडे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
राष्ट्रीय पोषण माह अभियान समारोप कार्यक्रमाची सुरुवात ही लेझीम पत्रकाद्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत गावातून प्रभात फेरी काढून करण्यात आली. प्रभात फेरी ठिकठिकाणी महापुरुषांच्या वेषभूषा सादरीकरण करण्यात आले होते.
तसेच नुकत्याच पुणे येथे नालंदा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने महाराष्ट्ररत्न आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सरपंच संजय वानखडे व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सीमाताई वानखडे या यांच्या यावेळी सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सीता उगले, अर्चना भगत, रूपेश अहीर , केशव पद्मने,गणेश बेंडे ग्रामपंचायत अधिकारी शशीकांत इंगळे, पोलिस पाटील ज्ञानदेव रोहणकार तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत विद्यामंदिर मुख्याध्यापक सुनंदा बाळे मॅडम, जी प. मुख्याध्यापक गणेश रावरकर कोतवाल राजू डाबेराव यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच संजय वानखडे, संचालन अंगणवाडी सेविका सुनंदा पद्मने तर आभार मुख्याध्यापिका सुनंदा बाळे यांनी मानले.

