Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Khairav-Barlinga Gram Panchayat :खैरव–बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ

Khairav-Barlinga Gram Panchayat :सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव–बारलिंगा गट ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडत सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. केवळ एका मताने निवडून आलेल्या सरपंचांविरोधात सदस्यांनी एकत्र येत हा निर्णायक पाऊल उचलल्याने ग्रामपंचायत राजकारणात खळबळ उडाली आहे.

Khairav-Barlinga Gram Panchayat

एका मताने निवडून आलेल्या सरपंचांवर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव–बारलिंगा गट ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडत सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. केवळ एका मताने निवडून आलेल्या सरपंचांविरोधात सदस्यांनी एकत्र येत हा निर्णायक पाऊल उचलल्याने ग्रामपंचायत राजकारणात खळबळ उडाली आहे.

तहसीलदार अजित दिवटे यांच्या निर्देशानुसार ३० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले असता, बहुमताने ठराव मंजूर झाला.

ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निर्णय प्रक्रियेत सदस्यांना विश्वासात न घेणे, जनहिताच्या विरोधातील निर्णय, विकासकामांमध्ये अडथळे, प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि कारभारातील पारदर्शकतेचा अभाव अशी गंभीर कारणे नमूद करण्यात आली आहेत.

तसेच, सरपंचांच्या पतीकडून कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे. या सर्व कारणांमुळे सदस्यांमध्ये असंतोष वाढत गेला आणि अखेर अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

या ठरावाला विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, मीनाक्षी विनोद म्हस्के, सुनीता सुरेश भालेकर आणि स्वाती शिवानंद खेडेकर या सदस्यांनी पाठिंबा देत स्वाक्षऱ्या केल्या. या घडामोडीनंतर खैरव–बारलिंगा ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली असून, नव्या सरपंच निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. गावात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून पुढील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top