Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

  Uddhav Sena :मोताळ्यात प्रजासत्ताक दिनी उद्धव सेनेच्या नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Uddhav Sena : तालुक्यातील शेलापूर–सांगद शेतरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व गणेश घाटे यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून टोकाचे आंदोलन केले.

  Uddhav Sena

मोताळा : तालुक्यातील शेलापूर–सांगद शेतरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व गणेश घाटे यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून टोकाचे आंदोलन केले.

रस्त्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून तीव्र आंदोलन छेडले. या प्रकारामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या.

दरम्यान, रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

तहसीलदारांवर गंभीर आरोप; पुढील आंदोलन महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर

आंदोलनानंतर उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे यांनी सांगितले की, शेलापूर–सांगद शेतरस्ता खुला करण्याबाबत त्यांनी वेळोवेळी मोताळा तहसीलदारांकडे निवेदने सादर केली. तसेच महसूल विभागाने शेतरस्ते खुले करण्यासाठी राबविलेल्या विशेष पंधरवड्यातही या रस्त्याचा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र तहसीलदारांनी या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

“२५ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात एक महिन्यात रस्त्याचे काम न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच आम्हाला आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला. पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तो पूर्ण होऊ शकला नाही,” असे घाटे यांनी स्पष्ट केले.

रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात न आल्यास आता थेट महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top