Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Rajesh Wajire :राष्ट्रीय सेवा योजना तरुणांना घडविणारे प्रेरणादायी व्यासपीठ – राजेश वजीरे

Rajesh Wajire : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन दत्त ग्राम हिवरा गणपती येथे दि. ७ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मुद्रांक जिल्हाधिकारी राजेश वजीरे यांनी तरुणांनी महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपले जीवन घडविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

Rajesh Wajire

वाशिम : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन दत्त ग्राम हिवरा गणपती येथे दि. ७ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मुद्रांक जिल्हाधिकारी राजेश वजीरे यांनी तरुणांनी महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपले जीवन घडविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव होते, तर उद्घाटक म्हणून हिवरा गावच्या सरपंच सौ. ज्योतीताई चौरे उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितीत धनराज घुगे, उपसरपंच विनोदराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वासराव देशमुख, संजाबराव देशमुख, सुभाषराव पवार, कार्यक्रमाधिकारी डॉ. पदमानंद तायडे व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. रिंकू रुक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेची पथके कार्यरत असून दरवर्षी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांद्वारे ग्रामीण भागातील विविध समस्या समजून घेऊन त्यावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास स्वयंसेवकांना प्रेरित केले जाते. यावर्षी ‘शाश्वत विकासासाठी युवक’ या संकल्पनेवर आधारित पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमीन विकास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास गावकरी व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पदमानंद तायडे यांनी करून सात दिवसीय शिबिराची रूपरेषा व राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच घमराव घुगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुभाष जाधव यांनी प्रेरणादायी उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रीय सेवा योजनेचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक यश देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रिंकू रुक्के यांनी मानले. उद्घाटन समारंभासाठी डॉ. संतोष धामणे, डॉ. संतोष इंगोले, डॉ. डी. एम. ढवारे, डॉ. विजय जाधव, श्री बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top