Murder of a young man : असाेला नवले येथील २५ वर्षीय युवकाची अंढेऱ्यातील बाजार गल्लीत धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना २५ ऑक्टाेबर राेजी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी तातडीने कारवाई करीत आराेपींना गजाआड केले. आकाश उत्तम चव्हाण असे मृतक युवकाचे नाव आहे.

धारदार शस्त्राने वार करून केली हत्या
अंढेरा : असाेला नवले येथील २५ वर्षीय युवकाची अंढेऱ्यातील बाजार गल्लीत धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना २५ ऑक्टाेबर राेजी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी तातडीने कारवाई करीत आराेपींना गजाआड केले. आकाश उत्तम चव्हाण असे मृतक युवकाचे नाव आहे.
अंढेरा येथील बाजार गल्लीत दि.२५ ऑक्टाेबर रोजी सायंकाळी आकाश उत्तम चव्हाण या युवकावर अंढेरा येथील अयान नासेर सय्यद व त्याचे इतर सहकाऱ्यांनी धारदार शस्ञाने पोटात खुपसुन हत्या केली.यामध्ये आकाश उत्तम चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना अंढेरा पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडली असल्याने तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.आणि घटनेतील आरोपींना अंढेरा पोलिसांनी राहत्या घरुन उचलुन आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अंढेरा पोलिस स्टेशन मध्ये बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असुन राञी दहा वाजता अंढेरा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रम्हा गिरी,ठाणेदार रुपेश शक्करगे, सिंदखेडराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार इंगळे तसेच अंढेरा पोलिस स्टेशनचे सिध्दार्थ सोनकांबळे,भरत पोफळे, नितीन पुसे, किशोर जाधव,जगन सरडे, सुरेश गवई यांनी घटनास्थळाला भेट दिली.

