Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

‘Vidarbha Pedicon–2026’: ‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’मध्ये एक हजाराहून अधिक बालरोगतज्ज्ञांचा सहभाग

‘Vidarbha Pedicon–2026’: विदर्भातील बालरोगतज्ज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची व बहुप्रतीक्षित असलेली ‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’ ही भव्य शैक्षणिक परिषद ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी शेगाव येथे उत्साहात पार पडली. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील अत्याधुनिक सभागृहात आयोजित या परिषदेत विदर्भासह महाराष्ट्र, देशातील विविध राज्यांमधून तसेच राष्ट्रीय पातळीवरील एक हजाराहून अधिक नामांकित बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.

‘Vidarbha Pedicon–2026’.
शेगाव येथे विदर्भातील बालरोगतज्ज्ञांसाठी ठरली भव्य शैक्षणिक मेजवानी : देशभरातील बालरोगतज्ज्ञांनी घेतला सहभाग

शेगाव : विदर्भातील बालरोगतज्ज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाची व बहुप्रतीक्षित असलेली ‘विदर्भ पेडिकॉन–२०२६’ ही भव्य शैक्षणिक परिषद ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी शेगाव येथे उत्साहात पार पडली. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील अत्याधुनिक सभागृहात आयोजित या परिषदेत विदर्भासह महाराष्ट्र, देशातील विविध राज्यांमधून तसेच राष्ट्रीय पातळीवरील एक हजाराहून अधिक नामांकित बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. परिषदेला इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर व इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेचे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजीव जोशी उपस्थित होते.

ही परिषद Academy of Pediatrics (AOP) खामगाव, AOP बुलढाणा व विदर्भ पेडियाट्रिक असोसिएशन (VPA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. विदर्भातील बालरोगतज्ज्ञांना अद्ययावत वैद्यकीय ज्ञान, आधुनिक उपचारपद्धती, संशोधन तसेच अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.

मान्यवरांची उपस्थिती

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशदादा पांडुरंग फुंडकर होते. यावेळी डॉ. उदय बोधनकर (मुख्य संरक्षक), डॉ. वसंत खळतकर (राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स), महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजीव जोशी, डॉ. त्रिवेदी, डॉ. राजेश सराफ, डॉ. अमित देशमुख, डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. हेमंत बंदे, डॉ. योगेश शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस विविध विषयांवर सखोल चर्चा

परिषदेत बालरोग विषयातील मूलभूत संकल्पना, नवीन मार्गदर्शक तत्त्वे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील बालरोग उपचारांमधील आव्हाने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये शास्त्रीय सत्रे, पॅनल चर्चा, कार्यशाळा, पोस्टर व पेपर सादरीकरण, पेडीक्विझ तसेच विशेष शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

‘Vidarbha Pedicon–2026’.

वॉकथॉनद्वारे जनजागृती

परिषदेदरम्यान आयोजित विविध वॉकथॉनमधून जनजागृती करण्यात आली. यामध्ये सुदृढ बालक, लसीकरण, ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’ आदी विषयांवर समाजप्रबोधन करण्यात आले. या उपक्रमांना डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘Vidarbha Pedicon–2026’.

शैक्षणिकतेसोबत सामाजिक बांधिलकी

या परिषदेनिमित्त सीपीआर जनजागृती कार्यशाळा, ‘आरोग्यदायी भविष्यासाठी पावले’ वॉकथॉन, स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे शैक्षणिकतेसोबतच सामाजिक जबाबदारीचाही प्रभावी संदेश देण्यात आला.

कोअर ऑर्गनायझिंग कमिटीचे मोलाचे योगदान

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राजेश सराफ, डॉ. सुभाष खरड (आयोजन अध्यक्ष), डॉ. सतीश तिवारी (अध्यक्ष, VPA), डॉ. अमित देशमुख (अध्यक्ष, AOP खामगाव), डॉ. गुरुप्रसाद थेटे (सचिव), डॉ. हेमंत बंदे (खजिनदार), डॉ. योगेश शेवाळे (अध्यक्ष, AOP बुलढाणा), डॉ. अक्षय हिरे (सचिव), डॉ. प्रदीप खार्डे (खजिनदार) यांच्यासह AOP खामगाव व AOP बुलढाणा येथील सर्व पदाधिकारी, उपसमिती सदस्य व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top