missing from farmers’ fields: डोणगाव व परिसरात शेतकर्यांच्या शेतातील साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय झाली आहे. 19 नोव्हेंबरच्या रात्री समृद्धी महामार्गालगतच्या शेतात अज्ञात चोरट्यांनी धाडी टाकत बुध्दू जुम्मा गवळी, संतोष विठोबा बोरकर आणि मुक्तेश्वर काळदाते यांच्या शेतातून सुमारे 100 ते 110 पितळच्या तोट्या लंपास केल्या.

डोणगाव परिसरात शेतीचे साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय !
डोणगाव : डोणगाव व परिसरात शेतकर्यांच्या शेतातील साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय झाली आहे. 19 नोव्हेंबरच्या रात्री समृद्धी महामार्गालगतच्या शेतात अज्ञात चोरट्यांनी धाडी टाकत बुध्दू जुम्मा गवळी, संतोष विठोबा बोरकर आणि मुक्तेश्वर काळदाते यांच्या शेतातून सुमारे 100 ते 110 पितळच्या तोट्या लंपास केल्या.या घटनेचा 20नोव्हेंबर रोजी उलगडा झाल्यानंतर संपूर्ण शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. सतत तोट्या चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, लोणी गवळी ते डोणगाव रस्त्यावर सध्या अवैध मुरूम व रेती वाहतुकीत वाढ झाली आहे. रात्री अपरात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने नियमितपणे फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडेही लक्ष देत अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी ग्रामीणांकडून मागणी होत आहे.

