Mohit Sharma: योगीराज ज्ञानपीठ अँड ज्युनिअर कॉलेज, शहापूर (ता. खामगाव ) येथील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी मोहित शेखर शर्मा याने अमरावती विभागीय स्तरावरील बॉक्सिंग किक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.

दिग्रस बु : योगीराज ज्ञानपीठ अँड ज्युनिअर कॉलेज, शहापूर (ता. खामगाव ) येथील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी मोहित शेखर शर्मा याने अमरावती विभागीय स्तरावरील बॉक्सिंग किक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
या यशामुळे मोहितची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ९, १० व ११ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तो सहभागी होणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका माधुरी दाभाडे यांनी दिली. मोहितच्या या कामगिरीचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष डॉ. रतन राठी, उपाध्यक्ष वसंत भट्टड, सचिव सुनीता राठी, मुख्याध्यापिका सौ. माधुरी दाभाडे तसेच आई-वडील यांनी दिले आहे. त्याचा सत्कार करून परिसरात कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

