2.75 lakh farmers: सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनाेज कायंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्यामाध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला हाेता. या पाठपुराव्याला आता यश आले असून दिवाळीपूर्वी केवळ दोन दिवसांत दाेन लाख ७५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूण १८५ कोटी रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१८५ काेटींच्या मदतनिधीचे वितरण : आतापर्यंत ५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ३५० कोटींची मदत वितरित
गजानन तिडके
देऊळगाव राजा : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनाेज कायंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्यामाध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला हाेता. या पाठपुराव्याला आता यश आले असून दिवाळीपूर्वी केवळ दोन दिवसांत दाेन लाख ७५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूण १८५ कोटी रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टी आणि पूरामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे करून अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. शासनाने मंजूर केलेली रक्कम युद्धस्तरावर वाटप करण्याचे काम करण्यात आले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे.
यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध निर्णयांनुसार जुलैपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत वितरित करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एकूण ३५० कोटींपेक्षा जास्त मदतनिधी थेट शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कायंदे यांचा पाठपुरावा
सिंदखेड राजा मतदार संघात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार मनाेज कायंदे vयांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना धीर दिला हाेता. तसेच मतदार संघातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, अशी खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले हाेते. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडून मदत मंजूर व्हावी, अशी मागणी पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून केली हाेती. जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनीही तत्परतेने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली हाेती. तसेच जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले हाेते. त्यामुळे, जिल्ह्यातील तब्बल दाेन ७५ हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच मदतीची रक्कम मिळाली आहे.


