Balapur: बाळापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय महिलांसाठी निश्चित झाल्यानंतर ८ ऑक्टोबर राेजी नगरपरिषदेच्या २५ नगरसेवकपदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण प्रक्रियेमुळे काही माजी नगरसेवकांची अपेक्षा धुळीस मिळाली, तर काहीजण इतर प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

नगराध्यक्षपदानंतर आता सदस्यपदाचे आरक्षण जाहीर : निवडणुकीची इच्छुकांची तयारी सुरू
बाळापूर : बाळापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय महिलांसाठी निश्चित झाल्यानंतर ८ ऑक्टोबर राेजी नगरपरिषदेच्या २५ नगरसेवकपदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण प्रक्रियेमुळे काही माजी नगरसेवकांची अपेक्षा धुळीस मिळाली, तर काहीजण इतर प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
नगर परिषद सभागृहात झालेल्या या सोडतीदरम्यान प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) निखील खेमणार, प्रभारी मुख्याधिकारी सतीश गावंडे आणि उपमुख्याधिकारी रमेश ठाकरे उपस्थित होते. यावेळी सक्षम अजय गवई व अस्मिता उमेश इंगळे या दोन चिमुकल्यांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. या वेळी माजी नगराध्यक्ष मो. जमीर शे. इब्राहीम, माजी नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आरक्षणावर आक्षेप किंवा सूचना असल्यास दि. ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी केले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण :
प्र. क्र. 1 – औरंगपुरा: (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 2 – सतरंजीपुरा: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 3 – जवळीवेस, कसाईवेस: (अ) नाम. प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 4 – चावलपुरा, आझमपुरा: (अ) नाम. प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 5 – छोटा मोमिनपुरा: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 6 – बल्लोचपुरा: (अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला
प्र. क्र. 7 – वजीराबाद, सैय्यदपुरा: (अ) नाम. प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 8 – आबादनगर: (अ) नाम. प्र. सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला
प्र. क्र. 9 – मोठा मोमिनपुरा: (अ) नाम. प्र. सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला
प्र. क्र. 10 – गुजराथीपुरा: (अ) नाम. प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 11 – मोठी मशिद, चौधरी गल्ली: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्र. क्र. 12 – कालेखानीपुरा: (अ) नाम. प्र. सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला, (क) सर्वसाधारण महिला

