Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Man arrested: सुगंधी पानमसाला, गुटखा विक्री करणाऱ्यास केले जेरबंद

Man arrested: स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा पथकाने गुटखा विक्रेत्यावर कारवाई करत आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुवासिक पानमसाला व गुटख्यासह एकाला जेरबंद केले. आरोपीकडून सुमारे 95,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमडापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीस अटक केली आहे.

Man arrested

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : 95 हजार 392 रुपयांचा एवज केला जप्त

बुलढाणा : स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा पथकाने गुटखा विक्रेत्यावर कारवाई करत आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुवासिक पानमसाला व गुटख्यासह एकाला जेरबंद केले. आरोपीकडून सुमारे 95,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमडापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीस अटक केली आहे.
दि. 05 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलढाणा उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेख तैसीफ शेख बुढण (वय 34), रा. इस्लामपूरा, अमडापूर, ता. चिखली हा प्रतिबंधित पानमसाला व गुटखा आपल्या घरातून विक्री करीत आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने आरोपीच्या राहत्या घराची कायदेशीर झडती घेतली असता विविध कंपन्यांचा सुवासिक पानमसाला व गुटखा असा एकूण 95,392 रुपयांचा साठा आढळला. त्यानंतर आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे अमडापूर येथे हस्तांतरित करण्यात आले.
अमडापूर पोलिसांनी आरोपीवर कलम 223, 274, 275, 123 बीएनएस, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(IV) व शिक्षापात्र कलम 59(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्था.गु.शा. बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पार पडली.ही कारवाई पोउपनि. अविनाश जायभाये, पोना. सुनील मिसाळ, अनंत फरताळे, पोकॉ गणेश वाघ यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top