district police force: जिल्हा पाेलीस अधीक्षक काेण या वादावर पडदा पडल्यानंतर नीलेश तांबे यांनी आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाेलीस दलात माेठे फेरबदल केले आहे. अनेक ठाण्यांचे ठाणेदार बलण्यात आले आहेत. चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांची सायबर सेलमध्ये बदली करण्यात आली असून भूषण गावंडे यांची चिखलीला बदली करण्यात आली आहे.

भूषण गावंडे चिखलीचे नवे ठाणेदार : १८ अधिकाऱ्यांच्या पाेलीस अधीक्षकांनी केल्या बदल्या
बुलढाणा : जिल्हा पाेलीस अधीक्षक काेण या वादावर पडदा पडल्यानंतर नीलेश तांबे यांनी आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाेलीस दलात माेठे फेरबदल केले आहे. अनेक ठाण्यांचे ठाणेदार बलण्यात आले आहेत. चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांची सायबर सेलमध्ये बदली करण्यात आली असून भूषण गावंडे यांची चिखलीला बदली करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलीस दल आस्थापना मंडळाच्या दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक पदांवर तात्पुरत्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर बदली व पदस्थापना करण्यात आली आहे.यामध्ये साेनाळ्याचे ठाणेदार सपोनि चंद्रकांत भरत पाटील यांची पिंपळगाव राजा येथे, पिंपळगाव राजाचे सपोनि मुकेश वासुदेव गुजर यांची वाचक शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर येथे बदली करण्यात आली आहे. एमआयडीसी मलकापूरचे संदीप काळे यांची साेनाळ्याच्या ठाणेदारपदी वर्णी लागली आहे.खामगाव शहरचे ठाणेदार
सपोनि भागवत शहादेव मुळीक यांची हिवरखेड येथे तर हिवरखेडचे सपोनि कैलास पंढरीनाथ चौधरी यांची नांदुरा येथे बदली करण्यात आली आहे. मलकापूर एमआयडीसीचे सपोनि हेमराज भगवान कोळी यांच्याकडे डायल ११२, दाेषसिद्धी विभागाचा प्रभार देण्यात आला आहे. नांदुऱ्याचे सपोनि नरेन्द्र प्रभाकर पेन्दोर यांची एमआयडीसी मलकापूर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्ष बुलढाणा येथील पोनि आशिष साहेबराव रोही यांची आर्थीक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे, शेगावचे पोनि नितीनकुमार विनायक पाटील यांची जळगाव जामाेदला, जळगाव जामाेदचे पोनि श्रीकांत रमेशराव निचळ यांची पासपोर्ट शाखा, बुलढाणा येथे तर लाेणारचे पोनि निमीष माधवराव मेहेत्रे यांची शेगाव येथे बदली करण्यात आली आहे.
आर्थिक शाखेचे पोनि प्रकाश कचरु सदगिर यांची बदली लाेणार येथे करण्यात आली आहे. सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित गुन्हे, तपास कागदपत्रे, केस डायऱ्या, अर्ज चौकशा व अन्य प्रकरणे संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून नव्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

