Mahatma Phule Youth Foundation : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे महात्मा फुले युवा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला स्थानिक तसेच परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, वातावरण आनंद आणि उत्साहाने रंगून गेले. हा महोत्सव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्रांगणात पार पडला.

राहुल साेनाेने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे महात्मा फुले युवा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला स्थानिक तसेच परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, वातावरण आनंद आणि उत्साहाने रंगून गेले.
हा महोत्सव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्रांगणात पार पडला. उद्घाटनप्रसंगी आमदार नितीन देशमुख, माजी जि.प. सदस्य डॉ. हिंमतराव घाटोळ, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य सचिन धनोकार, सुनील मानकर, अरुण पळसकार, दिपक मसने, अरुण हुसे, प्रकाश कंडारकर, चेतन कारंझकर, दत्ता मानकर, डॉ. वासुदेवराव फाळके, अनंता काळे, संदीप घाटोळ, रणजित अहीर, प्रकाश मसने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गरबा महोत्सवाला प्रारंभ झाला. स्थानिक व परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे सुश्रुत भुस्कुटे, अनिरुद्ध घाटोळ, अभिजित घाटोळ, मंगेश सोनटक्के, हर्षल जढाळ, राहुल सांगोकार, शैलेश मसने, अजय लोखंडे, श्रीकांत मसने, मंगेश मसने, गणेश लोखंडे, राहुल हांडे, प्रविण मसने, अनिल सोनटक्के, शिवा हुसे, सचिन धनोकार, सचिन घाटोळ, प्रशांत धनोकार, सुरज जढाळ, सुमीत हुसे, प्रफुल्ल वाढोकार, यश मसने आदींनी परिश्रम घेतले.

