Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Maa Jijau Jayanti : बिबी येथे माँ जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Maa Jijau Jayanti :  बिबी येथे राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ यांची ४२८ वी जयंती दि. १२ जानेवारी रोजी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Maa Jijau Jayanti

रमेश खंडागळे 

बिबी  : बिबी येथे राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ यांची ४२८ वी जयंती दि. १२ जानेवारी रोजी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी माता जिजाऊंचे आदर्श मातृत्व, त्यातून मिळणारे धैर्य, नेतृत्वगुण व राष्ट्रनिष्ठा यावर प्रकाश टाकण्यात आला.

मातोश्री महिला अर्बन बँकेचे संचालक डॉ. गायकी यांच्या संकल्पनेतून संत सेवालाल महाराज मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी लेझीम नृत्य सादर केले. जिजाऊ वंदनेद्वारे माँ जिजाऊ यांना मान वंदना देण्यात आली.

या कार्यक्रमास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, अभयदादा चव्हाण (माजी जि.प. समाजकल्याण सभापती), तुळशीराम करपे, बिबी ग्रामपंचायतीच्या सरपंच चंदाबाई गुलमोहर, उपसरपंच भास्कर खुळे, दीपक गुलमोहर, दिलीप बनकर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, तसेच विठ्ठल आटोळे, संदीपभाऊ बनकर, अनिस शेठ, बद्री गावडे, संतोष बनकर, अमोल मुळे, कैलास मुळे, महादेव कांगणे, प्रदीप बनकर, रमेश आंधळे, जाकीरभाई, डॉ. वाघ, डॉ. काकड, डॉ. गायकी, डॉ. राठोड, बाळासाहेब कुलकर्णी, भास्कर सोळुंके, दीपक गायकवाड, खंदारकर भाऊ, संजू खार्डे, ऋषी दंदाले, कृष्णा पंधें, ब्रह्मानंद वाकोडे, अशोक नरवाडे, प्रवीण इंदूरिया, विठ्ठल वायाळ, श्याम पाटोळे, अतिष तायडे, शत्रुघ्न चव्हाण (शाहीर), गणेश डुकरे, धनु कायंदे, परमेश्वर उगलमूगले, पवन दंदाले, अशोक काळे, सतीश रणमळे, राम कुवरजी, संतोष केंद्रे, प्रशांत बनकर, अनुप लाहोटी, पवन बनकर, राम गाडेकर आदींसह महावितरण व पोलीस कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top