Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Lightning Strikes Cattle Shed :सावखेड नागरे गोठ्यावर वीज कोसळली, तीन जनावरे दगावली

Lightning Strikes Cattle Shed :तालुक्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू असून वीजांचा कडकडाट सुरू होता. यादरम्यान सावखेड नागरे परिसरात गोठ्यावर वीज कोसळल्याने आग लागली. या आगीत तीन गायींचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत जनावरांसह साहित्यही जळाल्याने अशोक दराडे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले.

Lightning Strikes Cattle Shed

अवकाळी पावसाचा दणका : दराडे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान

देऊळगाव राजा : तालुक्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू असून वीजांचा कडकडाट सुरू होता. यादरम्यान सावखेड नागरे परिसरात गोठ्यावर वीज कोसळल्याने आग लागली. या आगीत तीन गायींचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत जनावरांसह साहित्यही जळाल्याने अशोक दराडे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले.

कांद्यांच्या शेतात लावली अफूची झाडे, धोत्रा नंदाई शिवारात १.११ क्विंटल अफु जप्त

देऊळगाव राजा तालुक्यात ३० मार्चच्या रात्री ८ वाजता सावखेड नागरेसह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान शेतातील गोठ्यावर वीज कोसळली.अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे गोठ्यावर वीज पडून तीन जनावरे दगावल्याची घटना घडली.

सावखेड नागरे येथिल अल्पभूधारक शेतकरी अशोक दराडे यांच्या मालकीच्या गोठ्यावर वीज कोसळली. यामुळे गोठ्याला आग लागली, या आगीत गोठ्यातील ३ गायींचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, पेट्रोल पंप, स्प्रिंकलर पाईप आदी जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. 31 मार्च रोजी सकाळी तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. दराडे कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात रब्बी पिकांना फटका 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेला गहु, मका पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले. तसेच वादळामुळे  आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top