Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

LCB’s crackdown: एलसीबीची धडक कारवाई, टिप्पर, ४ ब्रास रेतीसह ३५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त!

LCB’s crackdown: रेतीची अवैध वाहतूक करणारे टीप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा पोलीस स्टेशनया हद्दीत १३ नोव्हेंबर रोजी पकडले.पथकाने ४ ब्रास रेतीसह ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

LCB's crackdown
अंढेरा : रेतीची अवैध वाहतूक करणारे टीप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा पोलीस स्टेशनया हद्दीत १३ नोव्हेंबर रोजी पकडले.पथकाने ४ ब्रास रेतीसह ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) अमोल गायकवाड, आणि अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, खबऱ्यांच्या माहितीवरून नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी दिग्रस शिवारात पांढऱ्या रंगाचा टिप्पर येताना दिसला. त्याची पंचासमक्ष तपासणी केली असता, सदर वाहनात सुमारे ४ ब्रास अवैध रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने टिप्पर (किंमत ₹३५ लाख) आणि रेती (किंमत ₹४० हजार) असा एकूण ₹३५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी टिप्पर चालकावर कलम ३०३(२) बीएनएस सह कलम २१(१), २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपी चालकास अटक करण्यात आली. फिर्यादी म्हणून हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांनी तक्रार दाखल केली. कारवाईत पीएसआय अविनाश जायभाये, हे.कॉ. जगदेव टेकाळे, हे.कॉ. दिगंबर कपाटे, पो.ना. अनंता फरतळे, आणि पो.कॉ. दीपक वायाळ यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top