Chief Officer Arun Mokal: पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून विकास कार्यात योगदान द्यावे, नवीन पत्रकारांना प्रशिक्षण देण्यात यावे असे प्रतिपादन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्मित पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बाेलत हाेते.

देऊळगाव राजा : पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून विकास कार्यात योगदान द्यावे, नवीन पत्रकारांना प्रशिक्षण देण्यात यावे असे प्रतिपादन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्मित पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बाेलत हाेते.
शासनाच्या विशेष निधी योजनेतून २० लाख रुपये खर्च करून प्रशस्त पत्रकार भवन निर्माण करण्यात आले आहे. यासाठी माजी आमदार डॉ शशीकांत खेडेकर, डॉ. शिंगणे, आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, स्थापत्य अभियंता शुभम पाटील, किरण तायडे, बाळू शिंगणे, ठेकेदार अनिल बुरुकुल उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गणेश डोके, उपाध्यक्ष मंगेश तिडके, कोषाध्यक्ष प्रा अशोक डोईफोडे,माजी अध्यक्ष अशोक जोशी, शिवाजी वाघ, संतोष जाधव, राजू खांडेभराड, संतोष वासुंबे,मुन्ना ठाकूर, कादीर भाई, मुबारक भाई, किरण वाघ , उषा डोंगरे, तथा इतर उपस्थित होते. सर्वप्रथम मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी रिबीन कापून पत्रकार भवन चे उद्घाटन केले, त्यानंतर ग्रामदैवत बालाजी महाराज व पत्रसृष्टी चे जनक आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रस्ताविक अशोक जोशी यांनी केले, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके यांनी आपल्या भाषणातून गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकार भवन निर्माण चे स्वप्न आज साकार होत असल्याचे सांगून यासाठी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले असल्याचे सांगितले. संचालन प्रा अशोक डोईफोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष जाधव यांनी केले.

