Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Jambharun Zilla Parishad School :जांभरूण जि.प. शाळा ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानीत; पुण्यात शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान

Jambharun Zilla Parishad School :जांभरूण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने   ‘आदर्श शाळा पुरस्काराने २९ मार्च रोजी पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित भव्य सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले.

Jambharun Zilla Parishad School

 बबन इंगळे

बार्शीटाकळी : जांभरूण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने   ‘आदर्श शाळा पुरस्काराने २९ मार्च रोजी पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित भव्य सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले.

रोजगाराच्या आमिषाने गुंतवणुकीच्या नावाखाली ८० लाखांनी फसवणूक, आरोपी पालघरमधून जेरबंद

शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीची आणि गुणवत्तापूर्ण उपक्रमांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.  शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गुणवत्ता वृद्धी उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीमुळे येथील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. यामुळे जांभरूण जि.प. शाळेने तालुक्यासह जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्रप्रमुख बबन नांदे आणि शाळेचे मुख्याध्यापक भगवान चव्हाण यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात स्विकारला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित शिक्षकांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे, या शाळेच्या प्रगतीमागे शिक्षकवर्गाचा सातत्यपूर्ण परिश्रम आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे नवोन्मेषी उपक्रम महत्त्वाचे ठरले आहेत. शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी तत्कालीन मुख्याध्यापक अनिल भगत यांचे नेतृत्व, तसेच शिक्षिका ढवळे, करवते, लांडगे आणि कुटे यांचे योगदानही मोलाचे ठरले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच स्पर्धात्मक दृष्टीकोन विकसित झाला. या पुरस्कारामुळे जांभरूण गावासह बार्शीटाकळी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top