Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Illegal sand transportation:विनानंबर टिप्परमधून अवैध रेती वाहतूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Illegal sand transportation: तालुक्यात गत काही दिवसांपासून खडकपूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करण्यात येत आहे. रेतीच्या अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहिम सुरू केली आहे. 30 नोव्हेंबर रोजी रेतीची विना क्रमांकाच्या टिप्परमधून वाहतुक करणार्या दोघांविरुद्ध 3 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Send

रेती माफियांविरुध्द महसूल विभागाची धडक कारवाई

देऊळगाव राजा : तालुक्यात गत काही दिवसांपासून खडकपूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करण्यात येत आहे. रेतीच्या अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहिम सुरू केली आहे. 30 नोव्हेंबर रोजी रेतीची विना क्रमांकाच्या टिप्परमधून वाहतुक करणार्या दोघांविरुद्ध 3 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 देऊळगाव राजा–जालना बायपास रोडवर 30 नोव्हेंबर रोजी पहाटे एका विना नंबरच्या टिप्परमधून वाहतुक असल्याचे महसूलच्या पथकाला आढळले. या टिप्परच्या चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना  किंवा वैध कागदपत्रे नसल्याने महसूल विभागाने सदर टिप्पर ताब्यात घेतला.या प्रकरणी नायब तहसीलदार सायली हनुमंत जाधव (वय 31) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून ज्ञानेश्वर नवले, रा. सिनगाव जहागीर व शेख अकील शेख खलील यांच्याविरुद्ध कलम 303(2) BNS सहकलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966नुसार गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे. महसूलच्या पथ्काने तीन ब्रास रेती किंमत 60 हजार रुपये जप्त केली आहे. पुढील तपास मपोउपनि पटेल करीत आहेत.

रेती माफीयांचा तालुक्यात हैदोस

देउळगाव राजा तालुक्यात रेती माफीयांचा हैदोस सुरू आहे. महसूल विभागाच्या कारवाईनंतरही रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करण्यात येत आहे. विशेषत: महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना रेती माफीया सक्रीय होतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top