Hundreds of citizens ran: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा पोलिस दल आणि बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने “मिशन उडान” या उपक्रमाअंतर्गत रन फॉर युनिटी धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शहरातील शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत तीन किलोमीटर अंतर धावत राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले.

‘मिशन उडान’ अंतर्गत पोलिस प्रशासनाचा अभिनव उपक्रम
बोरगाव मंजू : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा पोलिस दल आणि बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने “मिशन उडान” या उपक्रमाअंतर्गत रन फॉर युनिटी धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शहरातील शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत तीन किलोमीटर अंतर धावत राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले.
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून “सजग, सक्षम, सुरक्षित – मिशन उडान” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अंतर्गत ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन निमित्त “रन फॉर युनिटी” आयोजित करण्यात आली होती. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित या धाव स्पर्धेत सहभागी नागरिक, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी शहराच्या मुख्य मार्गांवरून धावत एकात्मतेचा व ऐक्याचा संदेश दिला.
या प्रसंगी देशातील एकता, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देत सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक अजित जाधव, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, रविंद्र धुळे, ज्ञानेश्वर लांडे, माजी सैनिक सुभाष निर्मळे, हेडकॉन्स्टेबल संजय भारसाकडे, प्रमोद डोईफोडे, सचिन सोनटक्के, अक्षय देशमुख, सुदीप राऊत, सुनील ताराम, नितेश गवई, महादेव पातोंड, उमेश पुरी, नारायण शिंदे, महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या धाव उपक्रमात पोलिस पाटील, पत्रकार संघटना, वीर भगतसिंग पथक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच शहरातील महिला, पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष चक्रनारायण व विकास पल्हाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी मानले.

