Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Tractor and Two-Wheeler :ट्रॅक्टर-दुचाकीची भीषण धडक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Tractor and Two-Wheeler :देगाव-व्याळा मार्गावर सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. ३० मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

Tractor and Two-Wheeler

देगाव-व्याळा मार्गावरील हृदयद्रावक अपघाताने परिसरात हळहळ

बाळापूर : देगाव-व्याळा मार्गावर सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. ३० मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, देगाव येथून व्याळा दिशेने जाणारा ट्रॅक्टर रस्त्यावरील वळणावर पोहोचताच समोरून येणाऱ्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि दुचाकीस्वार तिच्याखाली दबला.  या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख देगाव येथील २३ वर्षीय शुभम सुधाकर कराळे अशी झाली आहे. संबंधित ट्रॅक्टर देगाव येथील धर्माळे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top