World Soil Day : जागतिक मृदा दिन (५ डिसेंबर) निमित्त मौजे माळवंडी (ता. बुलढाणा) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ झापे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी मयुरी खलाणे, सचिन चेके, तसेच मंडळ कृषी अधिकारी विकास गवई यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

१०० शेतकऱ्यांना मृदा चाचणी अहवालांचे केले वितरण
बुलढाणा : जागतिक मृदा दिन (५ डिसेंबर) निमित्त मौजे माळवंडी (ता. बुलढाणा) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ झापे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी मयुरी खलाणे, सचिन चेके, तसेच मंडळ कृषी अधिकारी विकास गवई यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच संगीताताई समाधान चव्हाण, उपसरपंच अशोकराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी अंभोरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली लहाने यांनी केले असून कृषी विभागातील सर्व अधिकारी यांनी समन्वय साधला.कार्यक्रमाच्या शेवटी १०० शेतकऱ्यांना मृदा नमुने चाचणी अहवालाचे वितरण करण्यात आले. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने पीक लागवड, खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे मार्गदर्शन मिळणार आहे.

