Rabi season!:जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 साठी राबविण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आणि कृषि कार्यालयातील तंत्र अधिकारी समृद्धी वांगसकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
बुलढाणा:जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 साठी राबविण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आणि कृषि कार्यालयातील तंत्र अधिकारी समृद्धी वांगसकर यांनी केले आहे.रब्बी हंगामातील ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, तर गहू, हरभरा आणि कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा आहे. तसेच शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रातील पतपुरवठा सातत्य राखणे आणि स्पर्धात्मकतेत वाढ घडवणे हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
योजना अधिसूचित पिके व अधिसूचित क्षेत्रांसाठी लागू राहील.
ही योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
विमा हप्ता दर: खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, आणि नगदी पिकांसाठी 5% इतका मर्यादित आहे.
रब्बी 2025-26 हंगामासाठी जोखीमस्तर 70% ठेवण्यात आला आहे.
पिकनिहाय शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर):
गहू – ₹450
हरभरा – ₹450
रब्बी कांदा – ₹225
शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य असून ई-पिक पाहणी नोंदणी आवश्यक आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावे अथवा अवैधरीत्या घेतलेल्या विमा प्रस्तावांना रद्द करण्यात येईल. तसेच बोगस विमा प्रकरणांवर फौजदारी कारवाई होईल.
शेतकऱ्यांनी विमा अर्ज सीएससी केंद्र मार्फत भरावा. शासनाने केंद्रधारकांना ₹40 मानधन निश्चित केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त शुल्क देऊ नये.या योजनेअंतर्गत विमा संरक्षण पिक पेरणीपासून कापणीपर्यंत रा
हील. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्यास, पिक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाईल. अधिक माहितीसाठी https://pmfby.gov.in/ , टोल फ्री क्रमांक 14447, किंवा आपल्या नजिकच्या कृषी कार्यालय/सीएससी केंद्राशी संपर्क साधावा.
मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा
हील. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्यास, पिक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाईल. अधिक माहितीसाठी https://pmfby.gov.in/ , टोल फ्री क्रमांक 14447, किंवा आपल्या नजिकच्या कृषी कार्यालय/सीएससी केंद्राशी संपर्क साधावा.
