MLA Manoj Kayande: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक परिस्थितीमुळे वेळेवर उपचार न घेता आजार बळावतात. रुग्णसेवेचा वसा घेत समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे हा गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचा मुख्य उद्देश आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे यांनी सांगितले. हे रुग्णसेवेचे कार्य निरंतर सुरू राहणार असल्याचा निर्धार संस्थेचे सहसचिव आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केला.

स्व. देवानंद कायंदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात ७,६५३ रुग्णांनी घेतला लाभ
देऊळगाव राजा : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक परिस्थितीमुळे वेळेवर उपचार न घेता आजार बळावतात. रुग्णसेवेचा वसा घेत समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे हा गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचा मुख्य उद्देश आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे यांनी सांगितले. हे रुग्णसेवेचे कार्य निरंतर सुरू राहणार असल्याचा निर्धार संस्थेचे सहसचिव आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केला.
शिक्षणमहर्षी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय देवानंद कायंदे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २ नोव्हेंबर) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात तब्बल ७,६५३ रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, हे विशेष उल्लेखनीय ठरले.
शिबिराचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल, देऊळगाव राजा येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, संस्थेचे सचिव सतीश कायंदे, डॉ. गणेश मांटे, संतोष खांडेभरड, दीपक बोरकर, टी. डी. शिंगणे, विनोद वाघ, आत्माराम कायंदे, राजेश इंगळे, प्रवीण गीते, अरविंद चव्हाण, गणेशराव बुरकुल, उद्धवराव म्हस्के, निशिकांत भावसार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार, मधुमेह, अस्थिरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा विकार, मेंदू विकार, किडनी, लिव्हर, पोटविकार, नेत्ररोग, छातीचे आजार इत्यादींवर मोफत तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषध वितरण, शस्त्रक्रिया, प्राथमिक नेत्र उपचार आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

या शिबिरात ७० पेक्षा अधिक डॉक्टरांनी आपली सेवा स्वेच्छेने उपलब्ध करून दिली. डॉ. अर्चना काबरा, डॉ. रमेश काकड, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. रामेश्वर वरकड, डॉ. गणेश कानडे, डॉ. सुहास विघ्ने, डॉ. युवराज म्हस्के, डॉ. निखिल शिंदे, डॉ. अतुल जिंतूरकर, डॉ. पंढरी माटे, डॉ. संतोष जायभाये, डॉ. तेजस साठे, डॉ. वैभव वायाळ, डॉ. अमित काबरा, डॉ. अश्विन काथार, डॉ. स्मिता काकड, डॉ. सतीश खार्डे, डॉ. सागर गंगवाल, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. प्रल्हाद धारूरकर, डॉ. अतुल काळे, डॉ. सचिन मिसाळ, डॉ. अमोल केंद्रे, डॉ. अपर्णा शिंदे, डॉ. नरेंद्र नागरे, डॉ. उमेश मुंढे यांच्यासह अनेक तज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदविला.शिबिर यशस्वी करण्यासाठी समर्थ फार्मसी महाविद्यालय तसेच समर्थ स्कूल ऑफ नर्सिंग व समर्थ कृषी महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले.
आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले की, “गजानन महाराज संस्थेचे उद्दिष्ट केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही; तर समाजसेवा आणि रुग्णसेवा हाच आमचा धर्म आहे. अशी शिबिरे सातत्याने आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली जाणार आहे.”

