Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Food and Drug Administration : संग्रामपूर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,  ७ औषध विक्रेत्यांना नोटीस

Food and Drug Administration : बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर  अन्न व औषध प्रशासनाने संग्रामपूर तालुक्यात धडक तपासणी केली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्री केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

Food and Drug Administration

 नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा ; संग्रामपूर, वरवट, वानखेड परिसरात औषध विक्री दुकानांची तपासणी

बुलढाणा : बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर  अन्न व औषध प्रशासनाने संग्रामपूर तालुक्यात धडक तपासणी केली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्री केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

खैरव–बारलिंगा ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ

२४ मार्च २०२६ रोजी एका वृत्तपत्रात संग्रामपुर तालुक्यात बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. तसेच एका व्यक्तीने १६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम हाती घेतल्याचे सहायक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके यांनी सांगितले.  त्या अनुषंगाने २७ मार्च २०२६ रोजी संग्रामपुर, वरवंट, बकाल आणि वानखेड परिसरातील औषध विक्री केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ औषध विक्री केंद्रांची पाहणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या तपासणीत झोपेच्या गोळ्या, गर्भपातासाठी वापरले जाणारे एमटीपी किट्स किंवा गुंगी आणणारी औषधे आढळून आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेकायदेशीर विक्रीबाबतच्या प्राथमिक शंकांना काही प्रमाणात विराम मिळाला आहे. मात्र, काही केंद्रांमध्ये नोंदवहीतील त्रुटी, फार्मासिस्ट अनुपस्थिती, प्रिस्क्रिप्शन नियमांचे उल्लंघन आणि परवाना अटींचे पालन न करणे अशा बाबी निदर्शनास आल्याने ७ औषध विक्री केंद्रांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उर्वरित ५ केंद्रांकडून त्रुटी पूर्ततेबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. दरम्यान, संग्रामपुर तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांना विना फार्मासिस्ट दुकान चालवू नये आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक आणि परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई 

अन्न व औषध प्रशसनाने तालुक्यात औषध विक्रीच्या दुकानांची नियमीत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यासह जिल्हाभरातील अवैध औषध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, अनेक किराणा दुकानांवर नियमबाह्य पद्धतीने काही औषधांची विक्री करण्यात येते. त्यावरही कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top