Khadakpurna project: बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णात पाण्याची आवक वाढल्याने २९ ऑक्टाेबर राेजी सकाळी पाच गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रात १२३०.३ घ.फूट/सें क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

१२३०.३ घ.फूट/सें.क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग
विठ्ठल पान्नासे
देऊळगाव मही : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णात पाण्याची आवक वाढल्याने २९ ऑक्टाेबर राेजी सकाळी पाच गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रात १२३०.३ घ.फूट/सें क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
खडकपूर्णा प्रकल्प यंदा ओव्हरफ्लाे झाला आहे. प्रकल्पात पाण्याची पातळी वाढल्याने तीन वेळा सर्वच गेट उघडण्यात आले हाेते. २८ ऑक्टाेबर राेजी खडकपूर्णा प्रकल्पाच्या क्षेत्रात जाेरदार पाउस झाल्याने जलपातळी वाढली. त्यामुळे, सुरूवातीला प्रकल्पाचे तीन गेट उघडण्यात आले हाेते. त्यानंतर आणखी दाेन गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहे. सध्या नदीपात्रात १२३०.३ घ.फूट/सें क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी – 520.500 मी. असून प्रकल्प संकल्पीत साठा-93.404द.ल.घ.मी. आहे. तसेच
आजची पाणी पातळी:- 520.500मी तसेच आजचा उपयुक्त साठा:-93.404द.ल.घ. मी आहे. प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी किंवा वाढवण्यात येणाार आहे. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रब्बी हंगामाला मुबलक पाणी मिळणार
खडकपूर्णा प्रकल्पात सुरूवातीला जलसाठा कमी हाेता. त्यानंतर मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात तर तीन वेळा प्रकल्पाचे सर्वच गेट उघडण्यात आले हाेते. त्यामुळे, खडकपूर्णा नदीला पूर आला हाेता. या पुरामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. यंदा प्रकल्प तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच या प्रकल्पावर याेजना असलेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

