Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Firefight in Anvi Mirzapur: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अन्वी मिर्झापूर येथे शनिवारी (दि. 29 डिसेंबर) सायंकाळी सुमारास भीषण आग लागून एक घर पूर्णतः जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरात असलेल्या 70 वर्षीय किसन मारोती करडे यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

Firefight in Anvi Mirzapur
ग्रामस्थांच्या वेळेवरच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला

संजय तायडे 

बोरगाव मंजू: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अन्वी मिर्झापूर येथे शनिवारी (दि. 29 डिसेंबर) सायंकाळी सुमारास भीषण आग लागून एक घर पूर्णतः जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरात असलेल्या 70 वर्षीय किसन मारोती करडे यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास देवलाल रामकृष्ण वानखडे यांच्या घरातून अचानक धुराचे लोट दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांचा वापर करून आग विझविण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीत भस्मसात झाले होते.

दरम्यान, घरात असलेले किसन मारोती करडे (वय 70) हे आगीत अडकून होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला. घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, हेडकॉन्स्टेबल सतीश हाडोळे, सुदिप राऊत व दत्तात्रय कुटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. ही आग घरावरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

आग लागल्याच्या वेळी घरातील इतर सदस्य मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. भरवस्तीत अचानक पेटलेल्या या आगीमुळे आसपासची घरेही धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र ग्रामस्थांनी तत्परतेने पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

किसन मारोती करडे यांच्या मृत्यूने गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top