Fatal accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार,तर एक तरुणी गंभीर जखमी झाले आहेत.

राहुल सोनोने
दिग्रस (बू) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार,तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून मेडशीकडे जात असलेली मोटारसायकल (क्रमांक MH-30 BV-5086) इरळा गावाजवळील सर्व्हिस रोडवर अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत मुकुंद श्रीकृष्ण बंड (18, रा. गुरुवार पेठ, पातूर, जि. अकोला) आणि अनुष्का गजानन केकन (18, रा. रिधोरा, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरती रामेश्वर गंगावणे (18, रा. रिधोरा) ही गंभीर जखमी आहे. तिघेही मालेगाव येथील ट्युशन क्लास संपवून घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल गोपाल हरणे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे, हेडकॉन्स्टेबल राजाराम कालापाड, सुखनंदन तांबारे, तसेच डायल-112 चे विलास पवार आणि सत्यप्रकाश सुपारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणी तसेच दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून मालेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून मालेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

