Farmers throng: अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या शेतीनुकसानीची दखल घेत शासनाने या वर्षी शेतकऱ्यांसाठी दुष्काळी मदत जाहीर केली. मात्र, तालुक्यातील केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच मदतीचा लाभ मिळाल्याने उर्वरित शेतकरी मदतीसाठी तहसील कार्यालयात रांगा लावत आहेत.

तेल्हारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या शेतीनुकसानीची दखल घेत शासनाने या वर्षी शेतकऱ्यांसाठी दुष्काळी मदत जाहीर केली. मात्र, तालुक्यातील केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच मदतीचा लाभ मिळाल्याने उर्वरित शेतकरी मदतीसाठी तहसील कार्यालयात रांगा लावत आहेत.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. परंतु अद्याप मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयात उपस्थित झालेल्या शेतकरी रामेश्वर बिहाडे (रा. वरुड बिहाडे) यांनी सांगितले, “माझ्याकडे चार एकर जमीन आहे. शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली, पण मला अजूनही मदत मिळालेली नाही.”
उर्वरित शेतकऱ्यांचीही मदत लवकरात लवकर प्रक्रिया व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

