Farmer commits suicide : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून ७० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील पार्डी येथे घडली. दादाराव नरिभान हिवराळे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

दिवाळीच्या पूर्व संध्येला उपचारादरम्यान मृत्यू
राहुल सोनोने
दिग्रस बू : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून ७० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील पार्डी येथे घडली. दादाराव नरिभान हिवराळे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
पार्डी येथील दादाराव हिवराळे यांना शेतात गत काही वर्षांपासून अपेक्षीत उत्पन्न हाेत नाही. त्यातच त्यांनी शेतीवर बँकेचे कर्ज,गटाचे कर्ज,खाजगी सावकाराचे कर्ज घेतले आहे. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत दादाराव हिवराळे यांनी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ च्या दरम्यान विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १६ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका आठवड्या पूर्वी एका युवा शेतकरी आत्महत्या झाली असताना लगेच अजून पार्डी गावात पुन्हा कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिवाळी सणाला १७ ऑक्टाेबरपासून सुरूवात हाेत असताना त्याच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा,सून व विवाहित तीन मुली असा आप्त परिवार आहे.

