Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Ex-soldier from Wadegaon dies:वाडेगावातील माजी सैनिकाचा झोपेतच हृदयविकाराने मृत्यू 

Ex-soldier from Wadegaon dies: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सैनिक रामदास पंढरी डोंगरे (वय ५८) यांचे शनिवारी (दि. १ नोव्हेंबर २०२५) पहाटेच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

Ex-soldier from Wadegaon

  राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सैनिक रामदास पंढरी डोंगरे (वय ५८) यांचे शनिवारी (दि. १ नोव्हेंबर २०२५) पहाटेच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जेवण करून झोपले होते. त्यांना दररोज पहाटे चार वाजता उठण्याची सवय होती; मात्र त्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत ते न उठल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. प्रतिसाद न आल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे निष्पन्न केले.

माजी सैनिक रामदास डोंगरे यांनी भारतीय सैन्यात तब्बल १७ वर्ष सेवा बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर ते कुटुंबासमवेत वाडेगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्या देशसेवेचा वारसा त्यांनी पुढील पिढीकडे सोपविला असून त्यांच्या दोन्ही मुलांनी सैनिक म्हणून देशसेवा सुरू ठेवली आहे.

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थ, नातेवाईक आणि माजी सैनिक संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top