Ravindra Ingle: नागपूर येथील मदत सामाजिक संस्था आयोजित २३वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन–२०२५ मध्ये रा. देगाव (ता. बाळापूर) येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र इंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

राहुल सोनोने
वाडेगाव : नागपूर येथील मदत सामाजिक संस्था आयोजित २३वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन–२०२५ मध्ये रा. देगाव (ता. बाळापूर) येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र इंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
सामाजिक जाणिवा वृद्धींगत करण्यासाठी तसेच विविध उपक्रमांद्वारे समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल इंगळे यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद घेऊन हा मानाचा बहुमान देण्यात आला.
हा पुरस्कार माननीय गिरीश पांडव (संचालक – राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट), माननीय अभिजीत वंजारी (आमदार – नागपूर विधान परिषद पदवीधर मतदारसंघ), तसेच प्रवीण पाटील, अनिल नगरारे, सिद्धार्थ तलवारे, दिनेशबाबू वाघमारे (सचिव) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
१६ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम, आगाराम देवी चौक, सुभाष रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात आकर्षक स्मृतीचिन्ह, दुपट्टा, पुष्पगुच्छ व संविधानाचे पुस्तक देऊन इंगळे यांचा सन्मान करण्यात आला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
यापूर्वीही रवींद्र इंगळे यांनी शासकीय उपक्रम यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवले आहेत. पुणे येथे त्यांना महाराष्ट्र पुरस्काराने गौरविण्यात आले असून विविध योजनांत गावाला गुणवत्तापूर्ण कामगिरीचे मानकरी बनवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

