Diwali in darkness ; येथील अनेक घरकुल लाभार्थ्यांना अद्यापही अनुदानाचा हप्ता न मिळाल्याने त्यांच्या दिवाळीचा आनंद फिका पडला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.पंचायत विभागाकडून १६ ऑक्टोबर रोजी घरकुल हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १८ ऑक्टोबरपर्यंतही हप्ता न मिळाल्याने गावातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

लाभार्थी आर्थिक अडचणीत; प्रशासनाविरोधात संताप
राहुल सोनोने
वाडेगाव : येथील अनेक घरकुल लाभार्थ्यांना अद्यापही अनुदानाचा हप्ता न मिळाल्याने त्यांच्या दिवाळीचा आनंद फिका पडला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.पंचायत विभागाकडून १६ ऑक्टोबर रोजी घरकुल हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १८ ऑक्टोबरपर्यंतही हप्ता न मिळाल्याने गावातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
घरकुल बांधकामासाठी अनेक लाभार्थ्यांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले किंवा कर्ज काढले, मात्र हप्ता न मिळाल्याने त्यांच्यावर कर्जाचे ओझे वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या दिवाळीचा सण अंधारात गेल्याचे चित्र दिसत आहे. लाभार्थ्यांना तात्काळ हप्ता मिळावा यासाठी ग्रामपंचायत सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सागर सरप, ग्रामपंचायत सदस्य मो. मुजाहिद, सुनील घाटोळ, शेख मोहीन मौलाना, डॉ. शेख चांद, सुनील मानकर, अंकुश शहाणे, सतीश सरप, सदस्या खैरुन्निसा शेख चांद आदींनी निवेदन सादर केले, मात्र त्यावरही काहीच कार्यवाही झालेली नाही.
प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, “१५ दिवसांपूर्वी तक्रार दिल्यानंतरही दखल न घेतल्याने आम्हाला कर्ज काढून दिवाळी साजरी करावी लागत आहे. आता पुढे काय करावे, या विवंचनेत आम्ही आहोत.”

