Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

District Collector :बांधकाम कामगारांना साहित्य वाटप आता तालुकास्तरावर; गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

District Collector : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी, सुरक्षा व अत्यावश्यक साहित्याचे वाटप आता तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. गर्दी टाळणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

District Collector

यवतमाळ  : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी, सुरक्षा व अत्यावश्यक साहित्याचे वाटप आता तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. गर्दी टाळणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पुसद आणि दारव्हा येथे सुरू असलेल्या साहित्य वाटपावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे वाटप तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले.

मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी शेलू बुद्रुक (ता. पुसद) तसेच शंकर जिनिंग अँड प्रेसिंग, जुना दिग्रस रोड (दारव्हा) येथे कंत्राटदारामार्फत साहित्य वाटप सुरू करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील वणी व झरी जामणीसारख्या दूरच्या तालुक्यांतील कामगारांना सुमारे २१० किलोमीटर अंतर प्रवास करून साहित्य घेणे अवघड जात होते. तसेच ऑनलाईन अपॉईंटमेंटद्वारे सुमारे तीन हजार किट वाटपाचे नियोजन असल्याने मोठी गर्दी आणि संभाव्य गोंधळाची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजीही कामगारांची मोठी गर्दी झाल्याने प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप केला.

यापुढे साहित्य वाटप प्रत्येक तालुक्यात स्वतंत्रपणे करण्यात येणार असून एका दिवशी जास्तीत जास्त ५०० बांधकाम कामगारांना साहित्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाटपाच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. तसेच कोणतेही वाटप सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे दूरवरच्या तालुक्यांतील बांधकाम कामगारांची गैरसोय कमी होणार असून साहित्य वितरण अधिक नियोजित व सुरक्षित पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top