Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Mahashivratri :महाशिवरात्रीनिमित्त धोत्रा नंदाई येथील हेमाडपंती महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेले धोत्रा नंदाई हेमाडपंती महादेव मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असून श्रद्धा व भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते.

Mahashivratri

गजानन भालेकर 

धोत्रा नंदाई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेले धोत्रा नंदाई हेमाडपंती महादेव मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असून श्रद्धा व भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते.

या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीतील असून अकराव्या ते बाराव्या शतकादरम्यान ते उभारले गेले असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. भव्य काळ्या पाषाणातील बारीक कोरीव काम, सुबक नक्षीकाम केलेल्या भिंती आणि दगडी रचनेमुळे मंदिराची प्राचीन वास्तुशैली विशेष ठळकपणे जाणवते. मंदिराच्या भूगृहात शिवलिंग स्थापित असून बाहेर भव्य नंदीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराजवळील दगडी भिंतींवरील सूक्ष्म नक्षीकाम आणि अखंड प्रज्वलित असलेला दगडी दिवा भाविकांचे लक्ष वेधून घेतो.

सभामंडपातील सहा खांबांवर कोरलेल्या मूर्ती हेमाडपंती वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानल्या जातात. मंदिरात येण्या-जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असून परिसरातील भाविक येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली असलेले हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्यकलेची विकसित परंपरा दर्शवते. दगडावर केलेले सूक्ष्म कोरीव काम आजच्या आधुनिक साधनांनीही करणे कठीण वाटावे इतके अप्रतिम आहे.

महाशिवरात्री निमित्त दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येत असून मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धा, इतिहास आणि स्थापत्यकलेचा संगम असलेले हे मंदिर परिसराच्या आध्यात्मिक ओळखीचे केंद्र ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top