Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Dawat-e-Sheerkhurma :वहदत-ए-इस्लामी हिंद, अकोला तर्फे ‘दावत-ए-शीरखुरमा’ कार्यक्रमाचे आयोजन

Dawat-e-Sheerkhurma : वहदत-ए-इस्लामी हिंद, अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दावत-ए-शीरखुरमा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. तेलीपुरा रोडवरील नगीना मशिदीच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dawat-e-Sheerkhurma

जाकीर अहमद

अकोला :  वहदत-ए-इस्लामी हिंद, अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दावत-ए-शीरखुरमा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. तेलीपुरा रोडवरील नगीना मशिदीच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईद-उल-फित्रच्या पवित्र निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजात शांतता, प्रेम आणि परस्पर आदराचा संदेश देणे हा होता. सकाळी सुमारे ११ वाजल्यापासूनच पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करत त्यांना ईदची पारंपरिक मिठाई ‘शीरखुरमा’ देऊन सन्मानित केले. पाहुण्यांनीही या स्वादिष्ट गोड पदार्थाचा आनंद घेतला.

कार्यक्रमात शहरातील सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवरांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा प्रकारचे कार्यक्रम समाजातील अंतर कमी करून परस्पर विश्वास आणि एकात्मता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. काही पाहुण्यांनी पहिल्यांदाच मशिदीत येण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मौलाना अब्दुल वहाब मलिक यांनी रमजान महिन्यातील रोजांच्या महत्त्वाबद्दल सांगत इस्लाममधील मूलभूत तत्त्वे, जसे तौहीद, रिसालत आणि आखिरत, या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना मशिदीबद्दलही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमासाठी वहदत-ए-इस्लामी हिंद, अकोलाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. सेवाभाव आणि शिस्तीच्या वातावरणात सर्व पाहुण्यांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top