Dasanavami festival :दासनवमी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ; ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान भरगच्च धार्मिक कार्यक्रम

साखरखेर्डा : येथील श्री गोविंद रामानंद समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानमध्ये ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दासनवमी महोत्सव उत्साहात साजरा होत असून आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सव काळात दररोज पहाटे ५.३० वाजता श्रींची काकडा आरती, सकाळी ७.३० वाजता अभिषेक सोहळा, सकाळी १०.३० वाजता नैवेद्य आरती सेवा, सायंकाळी ५.३० वाजता उपासना सेवा, सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा तसेच रात्री भजन व गायन सेवा होणार आहे.
११ फेब्रुवारी रोजी दासनवमी निमित्त पंकज किंबहुले यांचे प्रवचन, संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन आणि रात्री भूषण महाजन यांची गायन सेवा होईल. १२ फेब्रुवारी रोजी दशमी निमित्त वसु भारद्वाज यांचे प्रवचन, संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन व रात्री घननीळ पाटील यांचे गायन होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी एकादशी निमित्त वसु भारद्वाज यांचे प्रवचन, व्यास (पुणे) यांचे कीर्तन आणि रात्री आत्माराम दुतोंडे यांचे गायन सादर होईल.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी रामदास पंत आचार्य यांचे प्रवचन, अंबिकाताई लिंबेकर यांचे कीर्तन आणि रात्री श्रीपाद निंबेकर यांचे गायन होईल. १५ फेब्रुवारी रोजी शिवरात्री निमित्त मुकुंद मुळे यांचे प्रवचन, प्रणव बुवा जोशी यांचे कीर्तन व रात्री कृष्णेंद्र वाडीकर यांचे गायन सादर होणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी मुकुंद मुळे यांचे प्रवचन, प्रणव बुवा जोशी यांचे कीर्तन आणि रात्री नागेश अडगावकर यांचे गायन होईल.
१७ फेब्रुवारी रोजी प.पू. श्री प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामदास पंत आचार्य यांचे प्रवचन, दुपारी १२ वाजता गुलाल सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी रथोत्सव मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

