Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

 Indian culture :रासेयो विशेष शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत; भारतीय संस्कृतीचे दर्शन

Indian culture : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम हिवरा रोहिला येथे दि. ७ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात स्वयंसेवकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला.

Indian culture

वाशिम : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम हिवरा रोहिला येथे दि. ७ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात स्वयंसेवकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला.

भारताची संस्कृती महान मानली जाते; मात्र आधुनिक काळात तिचा विसर पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संस्कृती संवर्धनाचा संदेश दिला. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रनिष्ठा, समाजसेवा आणि जनजागृतीपर विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांत ‘नेशन एक्स’, ‘टी एक्स टी’, ‘युवाशक्ती’ आणि ‘सारथी’ या गटांनी नृत्य, नाटिका व समूहगीतांच्या माध्यमातून आकर्षक सादरीकरण केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पदमानंद तायडे आणि डॉ. रिंकू रुक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजाबराव देशमुख होते, तर प्रमुख उपस्थितीत डॉ. संतोष धामणे, डॉ. संतोष इंगोले, डॉ. डी. एम. ढवारे, डॉ. विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित राहून सांस्कृतिक सादरीकरणांचा आनंद घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top