Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Confusion in Lonar: प्रभागनिहाय मतदार याद्यांतील घोळामुळे लोणारमध्ये गोंधळ 

Confusion in Lonar: लोणार नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या १० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दिसत असून काहींची नावे संपूर्ण यादीतूनच गायब झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

lonar

लोणार : लोणार नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या १० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दिसत असून काहींची नावे संपूर्ण यादीतूनच गायब झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, संबंधित प्रशासनाने प्रारूप मतदार याद्यांवरील आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी कोणतीही स्पष्ट जनजागृती मोहीम राबवली नसल्याचा आराेप सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र काेचर यांच्यासह नागरिकांनी केला आहे.आक्षेपाची माहिती मिळाली नसल्याने मुदत संपल्यानंतरच बहुतेकांना याची जाणीव झाली आहे.
लोणार शहरातील मोठा भाग हा शेतकरी आणि मजूर वर्गाचा असून, सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्याने हे नागरिक शेतातील कामात व्यस्त आहेत. प्रशासनाकडून कोणतीही थेट माहिती न मिळाल्याने अनेकांना आपल्या नावाबाबतची खात्री करता आली नाही. काही मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात सरकवण्यात आल्याने, मतदानाच्या दिवशी ते आपल्या मूळ भागात मतदान करू शकणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.   प्रत्येक प्रभागातील घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी करण्यात यावी आणि सदोष यादी तत्काळ दुरुस्त करून योग्य ती नोंद करावी, जेणेकरून एकाही नागरिकाला मतदानापासून वंचित राहावे लागू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व त्रुटीविरहित ठेवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधून जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा या मतदार याद्यांतील त्रुटींमुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नागरिकांनीही आपल्या नावाची खात्री करून घेण्यासाठी नगरपालिका कार्यालयात किंवा ऑनलाईन माध्यमातून तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top