Chain snatching : शहरात भरदुपारी चेन स्नेचींगची घटना २० ऑक्टाेबर राेजी घडल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवर आलेल्या दाेघांनी महिला शिक्षिकेच्या गळ्यातील तब्बल अडीच ताेळ्यांची साेन्याची पाेथ हिसकावून पाेबारा केला. या प्रकरणी अज्ञात दाेन चाेरट्यांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे पाेलिसांनी चाेरट्यांचा शाेध सुरू केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
मलकापूर : शहरात भरदुपारी चेन स्नेचींगची घटना २० ऑक्टाेबर राेजी घडल्याने खळबळ उडाली आहे. दुचाकीवर आलेल्या दाेघांनी महिला शिक्षिकेच्या गळ्यातील तब्बल अडीच ताेळ्यांची साेन्याची पाेथ हिसकावून पाेबारा केला. या प्रकरणी अज्ञात दाेन चाेरट्यांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे पाेलिसांनी चाेरट्यांचा शाेध सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोनल आशिष राठी (वय ४२ वर्षे, व्यवसाय शिक्षक, रा. पदमालय अपार्टमेंट, मलकापूर) या एमएसएम इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या २० ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपली मुलगी रुशिका हिच्यासह स्कूटीने बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या जीएस मॉलमध्ये कपडे परत करून ‘डागा मार्ट’ येथे खरेदी केल्यानंतर ‘दुर्गा प्लास्टिक’ या दुकानात गेल्या. तिथे पसंतीची वस्तू न मिळाल्याने त्या बसस्टॉपपर्यंत गेल्या व पुन्हा त्या दुकानात परत आल्या. सामानाची खरेदी करून घरी परतत असताना, सिद्धीविनायक हॉस्पिटलसमोर दोन अज्ञात इसम शाइन मोटारसायकलवरून मागून आले. त्यापैकी गाडी चालवणाऱ्याने निळ्या रंगाचा शर्ट, तर मागे बसलेल्या इसमाने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. त्यांनी अचानक त्यांच्या स्कूटीसमोर गाडी आडवी केली व मागे बसलेल्या इसमाने सोनल राठी यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत (अंदाजे किंमत ₹75,000) हिसकावली व दोघेही दुचाकीवर बसून आस्था हॉस्पिटलकडे पळून गेले.
घाबरलेल्या सोनल राठी यांनी तत्काळ आपल्या पतीला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी त्या मलकापूर शहर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांविरुद्ध गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

