Bursting crackers : दिवाळीच्या सणात फटाक्यांचा उत्साह सर्वांनाच आवडतो, परंतु त्यांचा अतिरेक आणि सुरक्षिततेचा अभाव डोळ्यांसाठी गंभीर धोका ठरू शकतो. डॅ. राहुल बाहेकर, संजीवनी नेत्रालय, बुलढाणा यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे होणारी डोळ्यांची दुखापत बल, उष्णता आणि रसायनांच्या संयोगामुळे गंभीर असते. डॅ. बाहेकर यांनी स्पष्ट केले की, फटाके कायदेशीर असले तरी ते सुरक्षित नसतात. स्पार्कलर्स (फुलझडी/झाड) मुलांसाठी मनोरंजक वाटतात, पण बऱ्याच वेळा डोळ्यांची दुखापत याचमुळे होते.

अतिरेक आणि असुरक्षीतेचा अभावाने डाेळ्याला हाेवू शकताे गंभीर इजा
बुलढाणा : दिवाळीच्या सणात फटाक्यांचा उत्साह सर्वांनाच आवडतो, परंतु त्यांचा अतिरेक आणि सुरक्षिततेचा अभाव डोळ्यांसाठी गंभीर धोका ठरू शकतो. डॅ. राहुल बाहेकर, संजीवनी नेत्रालय, बुलढाणा यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे होणारी डोळ्यांची दुखापत बल, उष्णता आणि रसायनांच्या संयोगामुळे गंभीर असते. डॅ. बाहेकर यांनी स्पष्ट केले की, फटाके कायदेशीर असले तरी ते सुरक्षित नसतात. स्पार्कलर्स (फुलझडी/झाड) मुलांसाठी मनोरंजक वाटतात, पण बऱ्याच वेळा डोळ्यांची दुखापत याचमुळे होते.
फटाक्यांमुळे होणाऱ्या संभाव्य जखमा:
डोळ्याचा पडदा (नेत्रपटल) फाटणे, डोळा फुटणे, कॉर्नियावर ओरखडे पडणे, बर्न्स (स्नायूंवर आणि त्वचेत जळजळ) आदी फटाक्यांमुळे हाेण्याची शक्यता आहे.
सावधगिरीचे उपाय:
फटाके प्रौढ व अनुभवी व्यक्तींच्या देखरेखीखालीच लावा, मुलांना फटाके वाजवू देऊ नका, फटाक्यांपासून सुरक्षित अंतर राखा, कारण जवळून पाहणाऱ्यांना सर्वात जास्त दुखापत होते.
फटाक्यांमुळे दुखापत झाल्यास काय करावे:
त्वरित वैद्यकीय सेवा घ्या, डोळे चोळू किंवा धुवू नका, डोळ्यात अडकलेली वस्तू स्वतः काढू नका.
डोळ्यावर दाब देऊ नका आणि कोणतेही मलम लावू नका.
दिवाळीत फटाके फाेडताना काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे डोळ्याचा पडदा (नेत्रपटल) फाटणे, डोळा फुटणे, कॉर्नियावर ओरखडे पडणे, बर्न्स (स्नायूंवर आणि त्वचेत जळजळ) हाेवू शकते. फटाके फाेडतांना डाेळ्यांना इजा झाल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांना दाखवून द्यावे.
डाॅ. राहुल बाहेकर, नेत्रतज्ज्ञ,
संजीवनी नेत्रालय, बुलढाणा

