Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास

Burglary in Aland Village :तालुक्यातील आळंद गावात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या–चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत तब्बल १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Burglary in Aland Village

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील आळंद गावात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या–चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत तब्बल १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आश्रुबा बापुराव खाडे (वय २१, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ८ एप्रिलच्या रात्री ते ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने चोरून नेले. यामध्ये एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस (५० हजार), नथ (२ हजार), चार तोळ्यांचे चांदीचे जोडवे (४ हजार), मुलगा सूरजच्या लग्नातील सोन्याचा ओम (अंदाजे २,५००) तसेच पत्नीच्या कानातील सोन्याचे झुंबर व वेल (अंदाजे ७५ हजार) असा एकूण १,३३,५०० रुपयांचा मुद्देमाल  लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरात अज्ञात चोरट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करत आहेत. परिसरात गत काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top