Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात!

Bribery game exposed :फॅमिली पेन्शन सुरू करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा कोषागार कार्यालयातील तिघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना आरोपी जाळ्यात अडकले. या धडक कारवाईमुळे जिल्हा कोषागार कार्यालयात खळबळ उडाली आहे.

Bribery game' exposed

फॅमिली पेन्शनसाठी २० हजारांची मागणी; मृत पोलिसाच्या कुटुंबालाच लुटण्याचा प्रयत्न

बुलढाणा : फॅमिली पेन्शन सुरू करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा कोषागार कार्यालयातील तिघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना आरोपी जाळ्यात अडकले. या धडक कारवाईमुळे जिल्हा कोषागार कार्यालयात खळबळ उडाली आहे.

सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक १ प्रविण गोविंदराव मोंढे (वय ४५), पद–अपर कोषागार अधिकारी, वर्ग–२, जिल्हा कोषागार कार्यालय, बुलढाणा; आरोपी क्रमांक २ विनोद अब्बास घट्टे (वय ४३), पद–कनिष्ठ लेखापाल, वर्ग–३; तसेच आरोपी क्रमांक ३ जीवन पांडुरंग काळे (वय ३४), पद–लेखा लिपीक, वर्ग–३ यांचा समावेश आहे.

तक्रारदाराचे वडील २०२२ मध्ये पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले होते. २०२५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आईच्या नावे फॅमिली पेन्शन सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया जिल्हा कोषागार कार्यालयात प्रलंबित होती. ही प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. या वेळी तिन्ही आरोपींनी २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली.यानंतर दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा रचण्यात आला. अपर कोषागार अधिकारी मोंढे व लेखा लिपीक काळे यांच्या समक्ष कनिष्ठ लेखापाल घट्टे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय कार्यालयात पेन्शनसारख्या संवेदनशील विषयावर लाच मागितल्याने संताप व्यक्त होत आहे.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रमेश पवार व विलास गुसिंगे यांच्यासह एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

तक्रार करण्याचे आवाहन
शासकीय लोकसेवकाकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी त्वरित एसीबी बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८, व्हॉट्सअॅप क्रमांक ९४०५०९१०६४ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी केले आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top