Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Borgaon Manju police : बोरगाव मंजू पोलीसांची  धडक कारवाई: पाच ठिकाणी छापे; पाच जणांवर कारवाई, २,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Borgaon Manju police : अकोला जिल्ह्यात  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बोरगाव मंजु पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगारावर जोरदार कारवाई करण्यात आली. आज दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी बोरगाव मंजु पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत लोकांकडून पैशाची खायवाडी करून अवैधरीत्या जुगार चालविणाऱ्या पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण २,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Borgaon Manju police

अकोला : अकोला जिल्ह्यात  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बोरगाव मंजु पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगारावर जोरदार कारवाई करण्यात आली. आज दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी बोरगाव मंजु पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत लोकांकडून पैशाची खायवाडी करून अवैधरीत्या जुगार चालविणाऱ्या पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण २,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बोरगाव मंजु येथे अवैध जुगार चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी रविंद्र देविदास मोरे (रा. बोरगाव मंजु) याच्याकडून ४६० रुपये रोख, एक पेन, कार्बन तुकडा व आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध बोरगाव मंजु पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४०/२०२६ अन्वये कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्राम कुरणखेड येथे छापा टाकून शेख रफीक शेख अजिज (रा. कुरणखेड, ता. जि. अकोला) याच्याकडून ५२० रुपये रोख, पेन, कार्बन तुकडा व जुगाराची चिठ्ठी जप्त करण्यात आली. याप्रकरणी अपराध क्रमांक ४१/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

ग्राम कानशिवणी येथे अवैध जुगारावर कारवाई करताना रवि रमेश दहिगावकर (रा. अन्वी मिर्झापूर, ता. जि. अकोला) याच्याकडून ४०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ४२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

बोरगाव मंजु  येथे देवेंद्र लक्ष्मण नेमाडे (रा. तेलीपुरा, बोरगाव मंजु) याच्यावर छापा टाकून ६५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अपराध क्रमांक ४३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

ग्राम अन्वी मिर्झापूर येथे आनंद छोटेलाल यादव (रा. अन्वी मिर्झापूर, ता. जि. अकोला) याच्याकडून ५४० रुपये रोख, पेन, कार्बन तुकडा व आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी अपराध क्रमांक ४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या सर्व कारवाईत अवैधरीत्या जुगार चालविणाऱ्या पाच आरोपींकडून एकूण २,५७० रुपये रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांवर ऑपरेशन प्रहार अंतर्गत पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक   अर्चित चांडक,   अपर पोलीस अधीक्षक   बी. चंद्रकांत रेड्डी व   उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर  वैषाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजु पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, रविंद्र धुळे, मनोज उघडे तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top