two daughters murdered : पत्नीसाेबत झालेल्या वादानंतर पतीने दाेन जुळ्या मुलींची गळा चिरुन हत्या केल्याची घटना अंढेरा फाटा परिसरात घडली. दाेन्ही मुलींचे मृतदेह आराेपी पित्याने अंढेरा पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या अंढेरा फाटा परिसरातील जंगला फेकून दिला. त्यानंतर आराेपी स्वत: वाशिम पाेलीस स्टेशनमध्ये हजर झाला व त्याने खूनाची कबुली दिली. राहुल चव्हाण रा. रुई जि.वाशिम असे आराेपी पित्याचे नाव आहे.

आराेपी वाशिम जिल्ह्यातील रुइ येथील : वाशिम पाेलिसात स्वत: हजर हाेवून दिली खुनाची कबुली
ज्ञानेश्वर म्हस्के
अंढेरा : पत्नीसाेबत झालेल्या वादानंतर पतीने दाेन जुळ्या मुलींची गळा चिरुन हत्या केल्याची घटना अंढेरा फाटा परिसरात घडली. दाेन्ही मुलींचे मृतदेह आराेपी पित्याने अंढेरा पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या अंढेरा फाटा परिसरातील जंगला फेकून दिला. त्यानंतर आराेपी स्वत: वाशिम पाेलीस स्टेशनमध्ये हजर झाला व त्याने खूनाची कबुली दिली. राहुल चव्हाण रा. रुई जि.वाशिम असे आराेपी पित्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरी जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद झाला. त्यात संतापलेल्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल मुलींना घेऊन पुढे निघाला. रागाच्या भरात त्याने अंढेरा फाटा जवळील जंगलात आपल्या दोन मुलींचा गळा कापून निर्दयपणे खून केला.
यानंतर, स्वतः राहुल वाशिम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण घटना कबूल केली. पोलिसांनी तत्काळ अंढेरा फाटा परिसरात जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.घटनास्थळी डीवायएसपी मनिषा कदम, संतोष खराडे, ठाणेदार शक्करगे, पोलीस अधिकारी जारवार, फूसे, जाधव आदी पोहोचले असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना ऐकून परिसरातील नागरिक हादरले असून, दोन निष्पाप बालिकांचा जीव वादातून गेला हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

