Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Action taken against :बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कापी बहाद्दरावर कारवाई

Action taken against : बारावीच्या सार्वजनिक परीक्षेला आज, १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मेहकर तालुक्यात तहसीलदारांच्या भरारी पथकाने विविध परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देत कारवाई केली. या धडक तपासणीमुळे परीक्षा केंद्रांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Action taken against

मेहकर तहसीलदारांच्या भरारी पथकाची धडक मोहिम

मेहकर : बारावीच्या सार्वजनिक परीक्षेला आज, १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मेहकर तालुक्यात तहसीलदारांच्या भरारी पथकाने विविध परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देत कारवाई केली. या धडक तपासणीमुळे परीक्षा केंद्रांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने जिजामाता हायस्कूल, हिवरा खुर्द; आप्पा पाटील विद्यालय, नायगाव दत्तापूर; सरस्वती विद्यालय, जानेफळ; तसेच श्री शिवाजी हायस्कूल, मेहकर या चार शाळांना भेटी दिल्या. यापैकी जिजामाता हायस्कूल, हिवरा खुर्द येथे गैरप्रकार आढळून आल्याने एका विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या भरारी पथकात महसूल सहायक प्रवीण परमाळे, अश्विन ठाकरे, बंडू गोरे, महसूल सेवक मंगेश देशमुख, दीपक अवचार तसेच शिपाई यांचा समावेश होता. पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रप्रमुखांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक पेपरदरम्यान अशाच प्रकारच्या तपासण्या सुरू राहतील, असे निर्देश तहसीलदारांकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top