Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Teli samaj :जळगाव जामोद येथे तेली समाजाचा उद्या राज्यस्तरीय वधू–वर व पालक परिचय मेळावा

Teli samaj : जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजाचा राज्यस्तरीय भव्य मोफत वधू–वर व पालक परिचय मेळावा तसेच सोयरिक पुस्तिकेचे विमोचन शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्यास तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष रमेश आकोटकार यांनी केले आहे.

Teli samaj

 १ फेब्रुवारी रोजी सोयरिक पुस्तिकेचे विमोचन

साखरखेर्डा : जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजाचा राज्यस्तरीय भव्य मोफत वधू–वर व पालक परिचय मेळावा तसेच सोयरिक पुस्तिकेचे विमोचन रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्यास तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष रमेश आकोटकार यांनी केले आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका गुरफटून गेला आहे की सामाजिक भान हरपले जात आहे. सामाजिक मेळावे, संस्कार शिबिरे यांपासून समाज दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तेली समाजात आज असंख्य वधू-वर उपलब्ध असले तरी अपेक्षांमधील तफावत ही मोठी अडचण ठरत आहे.

तेली समाज हा पूर्वापार उद्योग-व्यवसायाशी निगडित असून आजही अनेक युवक यशस्वीपणे व्यवसाय उभारून दरमहा हजारो-लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. अनेक वेळा हे उत्पन्न नोकरीपेक्षा अधिक असते. पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असलेले शेकडो युवकही समाजात आहेत. मात्र तरीही अनेक पालक आपल्या मुलीसाठी केवळ नोकरी करणारा वरच शोधत असल्याचे वास्तव आहे.

हा वधू–वर परिचय मेळावा केवळ ओळख करून देण्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील नाते-संबंध दृढ करण्याचा एक महत्त्वाचा दुवा ठरावा, हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. सुखाच्या धाग्यातून समाजाची मजबूत माळ विणली जावी, अशी संकल्पना या उपक्रमामागे असल्याचे रमेश आकोटकार यांनी सांगितले. “सुई आयोजकांच्या हातात आहे, मात्र माळ समाजाने एकत्र येऊन तयार करायची आहे,” असे त्यांनी नमूद केले.

या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रामदासजी तडस, महाराष्ट्र भाजपचे महामंत्री व तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बालमुकूंद भिरड, अमरावती जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र दिवटे, तेली महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष भुषण भिरड, शुभम सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी नगरसेवक प्रशांत नायसे (खामगाव), नगरसेविका सौ. गायत्रीताई खेडकर (नांदुरा), नगरसेवक रोशन पांडव (नांदुरा), नगरसेवक रविंद्र उमाळे (शेगाव), नगरसेविका सिमाताई देव्हडे (चिखली), नगरसेविका विमलताई देव्हडे (चिखली) व नगरसेविका सौ. संध्याताई गवात्रे (तेल्हारा) यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या राज्यस्तरीय वधू–वर व पालक परिचय मेळाव्यास तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रमेश आकोटकार, नंदकिशोर काथोटे व संजय चोपडे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top