truck hits a parked car : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू नवीन बायपासजवळ उभ्या कारला ट्रकने दिलेल्या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील चारही प्रवासी त्या वेळी वाहनाबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

बोरगाव मंजू नवीन बायपासजवळील घटना : कारचे नुकसान, सुदैवाने चार प्रवाशी बचावले
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू नवीन बायपासजवळ उभ्या कारला ट्रकने दिलेल्या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील चारही प्रवासी त्या वेळी वाहनाबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४९ एफ ०७३१ क्रमांकाची कार मुर्तिजापूरहून अकोल्याच्या दिशेने जात होती. बायपासवरील डी. के. हॉटेल चौकात कार उभी असताना जीजे १३ एटी ८५४३ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले; मात्र कारमधील चार प्रवासी वाहनाबाहेर असल्याने जीवितहानी टळली.या बायपासवरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही हा मार्ग धोकादायक ठरत असून येथे दिवसाआड अपघातांची मालिका सुरूच आहे. हा ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून पोलिस नोंदवहीत नोंदला आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, हेडकॉन्स्टेबल आकाश यादव, महादेव पातोंड, नारायण शिंदे, शिवहरी लांडगे, संजय सैतवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

