truck and an ST bus : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अकोला–वाशीम महामार्गावरील बोडखा गावाजवळ टिप्पर व राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला. या अपघातात दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.

अकोला वाशिम मार्गावरील बोडखा गावाजवळ घडला अपघात
राहुल सोनोने
दिग्रस बू : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अकोला–वाशीम महामार्गावरील बोडखा गावाजवळ टिप्पर व राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला. या अपघातात दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोडखा येथील गिट्टी खदानीतून टिप्पर क्रमांक एमएच ३० बीडी २६८२ हा मुरूम घेऊन जात असताना, पातूरकडून वाशीमकडे जाणारी परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच १३ सीयू ७१३५ हिने टिप्परला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील प्रवासी चंद्रप्रभा सुरेंद्र मनमोडे (वय ७०, रा. वाशीम) व वर्षा शैलेश अत्तरकर या दोन महिला जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच बोडखा येथील युवकांनी तत्काळ जखमी महिलांना उपचारासाठी पातूर येथे रवाना केले तसेच पातूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर सहायक ठाणेदार बंडू मेश्राम, पोलीस कर्मचारी सत्यजित ठाकूर व वाहतूक पोलीस म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती.

